संरक्षक भिंत कोसळून ५ कार, ७ मोटरसायकलींची हानी

0
147
आके-मडगाव येथे संरक्षक भिंत कोसळून झालेली वाहनांची हानी. (छाया : गणादीप शेल्डेकर)

पावसाचा परिणाम : आके-मडगाव येथील घटना
आके येथील दाऊद रेसिडेन्सी येथील दगडी संरक्षक भिंत कोसळून दाऊदमधील तीन कार गाड्यासहीत, प्रतिभा हाऊसिंग सोसायटीच्या जी व ई इमारतीतील दोन कारसहीत सात मोटरसायकलींची हानी झाली त्यांत सात मोटरसायकलीही दगड व मातीखाली चिरडल्या गेल्या. या संरक्षक भिंतीमुळे २० ते २५ लाख रुपयांची हानी झाली. पथदिव्याचे तीन खांब कोसळले. पाण्याची वाहिनी फुटली. ही घटना पहाटे पाच वाजता घडली.आके येथील प्रतिभा हाऊसिंग सोसायटी व दाऊद रेसिडेंसी या संकुलाच्या मधोमध दोनशे मिटर लॉबीची चार ते पाच फूट उंचीची संरक्षक भिंत बांधली होती. दाऊद रेसिडन्सीची जागा सहा फुट उंचीवर असून ती कोसळू नये म्हणून चिर्‍यांची बांधली होती. या इमारतीचे बांधकाम करताना जुनी संरक्षक भिंत पाच वर्षांआधी कोसळून प्रतिभा सोसायटींतील सात वाहने चिरडली गेली होती. तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी भेट देऊन पक्की संरक्षक भिंत बांधून देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार तीन वर्षांआधी पक्क्या चिर्‍यानी ती बांधली होती पण पावसाचे पाणी बाहेर जाण्यास योग्य व्यवस्था न केल्याने पाणी भुसभुशीत मातीत जाऊन काल भिंत कोसळली. ती कोसळताना दाऊद रेसिडेन्सीतील भिंतीलगत ठेवलेल्या दोन कार कोसळून प्रतिभा सोसायटीत पडल्या व दोन मध्ये अडकून राहिल्या. तसेच प्रतिभा सोसायटीच्या दोन कारगाड्यांचे नुकसान झाले. सात मोटरसायकली माती व दगडांच्या ढिगार्‍याखाली गाढून हानी झाली. एक पथदीप खांबा व दाऊद रेसिडेन्सीतील दोन वीज खांब कोसळले. सकाळी ५ वाजता कांनठळ्या बसणारा आवाज झाल्याने लोक खडबडून जागे झाले.
प्रतिभा सोसायटीतील नारायण नाईक यांची आल्टोकार व वासीम शेखची व्हेगनार कारचे नुकसान झाले तर ऋषिकेश नाईक, वासीम शेख, मधु साऊंड, श्रुती व चेतना भटीरे यांच्या दोन, फातीमा अनमन, रेव्हदारो एम यांच्या मोटरसायकलींची पूर्ण हानी झाली. दाऊद रेसिडेंन्सीमधील अनुप गोरे यांची ओपेल कार वरून खाली पडली. युसुफ शेख याची इंडिका कारमध्ये अडकून चिरडली तर मौसीन याची सेंट्रो कारचे नुकसान झाले.
प्रतिभा सोसायटीचे चेअरमन अनिल पै यांनी त्याच संकल्पात राहणार्‍या नगरसेवक दामोदर शिरोडकर यांनी माहिती देताच तात्काळ तेथे नारायण नाईक आले व हालचाली सुरू झाल्या. ठेकेदार शेख हिदायतुल्ला घटनास्थळी पोहोचून त्यांनी मदतकार्य सुरू केले. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, जिल्हाधिकारी व्हेन्सियु फुर्तादो यांना खबर देतांच ते घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत पाणी वीज खात्याचे अधिकारी, अग्नीशामक दल व पोलिस तेथे पोहचले व काम सुरू केले. पोलीस क्रेन व एक खाजगी क्रेन, जेसीबी बोलावून गाड्या वरती काढल्या व भिंतीची माती, चिरे गोळा करण्यास जलद गतीने सुरु केले.
नगरसेवक सदानंद नाईक व बबिता नाईक यांना खबर देताच त्यांनी स्वत:चे ट्रक घेऊन जागा साफ केली. नैसर्गिक आपत्तीकालीन व्यवस्थापनचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी व्हेनासियु फुर्तादो यांनी व्यवस्थापनातर्फे सर्व यंत्रणा कामाला लावली. त्यामुळेच ते काम होऊ शकले. या कामी आमदार दिगंबर कामत यानी फार मोठी मदत केली.