वाळपई नृहा पेट्रोल पंपाजवळ काल सकाळी १० वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात नारायण साळगावकर (वय ४२, मये) याचा जागीच मृत्यू झाला तर पांडुरंग हळर्णकर (मोरजी) हा गंभीर जखमी झाला. याबाबत वृत्त असे पांडुरंग हळर्णकर हा वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्रात सुरक्षा रक्षकाचे प्रशिक्षण घेत आहे. तो आजारी असल्याने प्रशिक्षण केंद्रातील अधिकार्यांनी त्याला घरी नेण्यास सांगितले. त्याला नेण्यासाटी त्याचा मामा नारायण साळगावकर हा जीए ०१ जे ०९६१ क्रमांकाची ऍक्टीव्हा स्कुटर घऊन वाळपईहून होंडा मार्गे जात असता त्याच्या विरुध्द दिशेने निखिल पाटील हा जीए ०४ सी. ३९५१ क्रमांकाची व्हेगनार कार घेऊन भरवेगाने आला असता मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यात स्कुटर चालक जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी पांडुरंग हळर्णकर याला गोमेकॉ येथे हलविण्यात आले. कार चालक निखिल पाटील ह्याला अटक करण्यात आली आहे. वाळपई पोलीस निरीक्षक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पंचनामा केला.