महाराष्ट्र भाजप विधीमंडळ नेता निवड सोमवारी

0
75

महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला आता येत्या सोमवारपासून वेग येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सर्वाधिक जागा मिळवलेल्या भाजप विधीमंडळ गटाची बैठक सोमवारीच होणार असून यावेळी विधीमंडळ नेत्याची निवड होण्याची अपेक्षा आहे. देवेंद्र फडवणीस यांची यावेळी नेतेपदी निवड होण्याची शक्यताही आहे. सरकार स्थापनेसंदर्भात शिवसेनेकडून अनुकुलता व्यक्त झाल्याचे वृत्त असले तरी भाजपकडून त्या अनुषंगाने ‘कोणता प्रतिसाद आहे ते उघड झालेले नाही. भाजपचे निरीक्षक म्हणून राजनाथ सिंह सोमवारी येणार असून त्यांच्या उपस्थितीत भाजप विधी मंडळ नेत्याची निवड होईल असे सूत्रांनी सांगितले.