![22Diwali Ank prakashan.jpg22](https://navprabha.com/wp-content/uploads/2014/10/22Diwali-Ank-prakashan.jpg22.jpg)
दैनिक नवप्रभाच्या यंदाच्या दीपावली विशेषांकाचे प्रकाशन गोव्याचे मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते काल पर्वरी येथे सचिवालयात झाले. यावेळी नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू, नवहिंद पब्लिकेशन्सचे सरव्यवस्थापक श्री. प्रमोद रेवणकर, उपसरव्यवस्थापक श्री. विजय कळंगुटकर, तसेच नवप्रभाचे प्रतिनिधी व कोकणी कवी श्री. संजीव वेरेकर, श्री. बबन भगत, नवहिंद टाइम्सचे विशेष प्रतिनिधी श्री. रामनाथ रायकर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाशी एक वाचक म्हणून असलेले आपले नाते अधोरेखित केले.