जयललिता यांची सुटका

0
94

तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजुर केल्याने काल त्यांची तुरुंगातून सुटका झाली. बेंगलुरू कारागृहातून सुटका झाल्यावर एका खास विमानाने त्यांना काल चेन्नईला नेण्यात आले. अभाअद्रमुक कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. गेले २१ दिवस त्या तुरुंगात होत्या. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर काल दुपारी ३.१० वाजता त्यांची बेंगलुरूतील कारागृहातून सुटका करण्यात आली. यावेळी तामीळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वन यांनी तुरुंगाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जयललितांच्या पुढे रस्त्यावर सपशेल लोटांगण घातले. त्यांच्यामागे यावेळी अभाअद्रमुकचे समस्त मंत्रिमंडळ, आमदार व खासदार उभे होते. त्यांनीही पनीरसेल्वन यांचीच री ओढत लोटांगण घालून आपली निष्ठा व्यक्त केली.