येत्या नोव्हेंबर अखेरीस सर्व मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांचे प्रगती पुस्तक तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री या नात्याने त्यांच्या खात्यातील कामाचा आढावा घेणे आवश्यक आहे. वीज खात्यासह अनेक खात्यांच्या कामात सुधारणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक खात्याच्या कारभारात मुख्यमंत्री लक्ष ठेवू शकत नाहीत, असेही ते म्हणाले.