राज्याच्या सीमेवरील टोल नाक्यांवर आकारण्यात येणार्या शुल्काविषयी भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्याने सदर विषयाचा फेरआढावा घेण्याचे सरकारने ठरविले असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. येत्या अर्थ संकल्पावेळी फेरआढावा घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शेजारच्या राज्यांतून विरोध होत असल्याने सरकार फेरविचार करणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.