सबसॉनिक क्षेपणास्त्र ‘निर्भय’चे यशस्वी परीक्षण

0
95

एक हजार किलोमीटरपर्यंत मारा करू शकणारे भारताचे पहिले ‘सबसॉनिक आण्विक क्षेपणास्त्र’ निर्भय या क्रूझ क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी घेण्यात आली. काल सकाळी १० वाजून ३ मिनिटांनी चांदीपूर परीक्षण रेंजमधून या क्षेपणास्त्राचे यशस्वीरित्या परीक्षण करण्यात आले. ७०० किलोमीटरहून अधिक दूर असणार्‍या लक्ष्याला या मिसाईलद्वारे लक्ष्य बनविले जाऊ शकते. संपूर्ण पाकिस्तानदेखील आता या मिसाईलच्या टप्प्यात आले असून जगातील कोणत्याही रडार तसेच हायटेक एअर डिङ्गेंस सिस्टीमला चकवा देण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे. जगातील अमेरिका, रशिया, चीन, अशा काही मोजक्याच देशांकडे लांब पल्ल्याचे क्रूझ क्षेपणास्त्रे आहेत.