हळदोणे येथील विधी उर्फ शांती वासुदेव उर्फ रवी केरकर या २३ वर्षीय विवाहित महिलेने काल सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान आपल्या राहत्या घराच्या छप्पराच्या वाशाला दुपट्याच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. म्हापसा पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. विवाह होऊन एक वर्षच झालेले असल्याने पुढील तपास उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.