भारतीय हवाई दलाचे सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमान पुणेनजीक काल कोसळले. दरम्यान, विमानातील दोन्ही पायलट बचावले, असे प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांच्या काळात १९ लढाऊ विमाने कोसळली आहेत. यात आठ मिग-२१, तीन जगुआर, तीन मिग २९, दोन सुखोई, दोन मिराज, एक मिग २७चा समावेश आहे.