दक्षिण गोव्यातील माजोर्डा व पाळोळे हे दोन किनारे सोडल्यास अन्य सर्व किनार्यांवर शॅक्ससाठीचे आरेखन पर्यटन खात्याने यापूर्वीच पूर्ण केले असल्याचे खात्याचे उपसंचालक अरविंद खुटकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.दरम्यान, शॅकमालकांना गेल्या वर्षी शॅकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची अट घालण्यात आली होती. मात्र, शॅक मालकांनी या अटीचे पालन केले नव्हते. यंदा पुन्हा त्यांना ही अट घालण्यात आलेली असून तिची पूर्तता करावीच लागणार आहे. शॅक मालकांनी सीसीटीव्ही बसवले आहेत की नाही यासंबंधीची पहिली पाहणी फेब्रुवारी महिन्यात गोवा पोलिसांतर्फे करण्यात येणार आहे. तद्नंतर आणखी दोन वेळा अशाच प्रकारची पाहणी करण्यात येणार असून या पाहण्या मार्च महिन्यात होणार असल्याची माहिती खुटकर यांनी दिली.