सापळा रचून रानडुकरास ठार केल्याप्रकरणी तळावली – फोंडा येथील दोघांना रविवारी रात्री वन अधिकार्यांनी अटक केली. या शिकारीबाबत एका बिगर सरकारी संघटनेने अधिकार्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी छापा टाकून दोघांना अटक केली. रानडुकर त्यांच्या ताब्यात सापडला. अटक केलेल्यांची नावे तुकाराम नाईक, प्रितेश नाई अशी आहेत. या दोघांपैकी एक सरकारी सेवेत असल्याचे कळते. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे उपविभागीय वन अधिकारी प्रदीप वेर्णेकर यांनी सांगितले.