निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने महाराष्ट्रात निवडणूक प्रचार काळात १४.५ कोटी रु. रोकड जप्त केली आहे तर ७५.९९ लाख रुपयांची सुमारे २.८ लाख लीटर दारुही हस्तगत केली आहे. दरम्यान, उमेदवारांकडे सापडलेली रोकड रु. ४.५ लाक एवढी असल्याचे आकडेवारी सांगते. निवडणुकीत काळ्या पैशांचा तसेच बेकायदेशीर निधीचा वापर रोखण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने उच्चपदस्थ अधिकार्यांची पथके गठीत केली आहेत.