ऍटलेटिको दे कोलकाता- मुंबई सिटी एफसी शुभारंभी झुंज
भारतीय फुटबॉलमध्ये नवचैतन्य निर्मिण्याच्या अपेक्षेतील बहुचर्चित इंडियन सुपर लीगचा प्रारंभ आजपासून होत आहे. ऍटलेटिको दे कोलकाता आणि मुंबई सिटी एफसी यात आज येथील येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर शुभारंभी मुकाबला होईल. भारतीय फुटबॉलला नवसंजीवनी देण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या या पहिल्या वहिल्या प्रतियोगितेच्या शुभारंभ सोहळ्यानिमित्ताने अमिताभ बच्चनसह अनेक बॉलिवूड सेलेब्रिटीज तसेच भारताचा सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नंी सौ. निता अंबानी, माजी भारतीय क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली आदि नामवंत प्रथमच एका मंचवर येतील. प बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह नामवंत शुभारंभ सोहळ्याला उपस्थित असतील.आयएसएल ही आयपीएलनंतरची देशातील सर्वांधिक पैसा गुंतविण्यात आलेली प्रतियोगिता असून आठ फ्रँचाइजी संघात जेतेपदासाठी चुरस होईल. भारतातील अग्रणी उद्योगपतींसह अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, रणबीर कपूर आदि बॉलिवूड सेलेब्रिटीजनी या प्रतिष्ठेच्या प्रतियोगितेत विश्वविख्यात फुटबॉलपटूना पाचारण करण्यासाठी करोडो रुपयांची गुंतवणूक केलेली आहे.
इटालीचे अलेस्सांद्रो डेल पिएर्रो आणि मार्को मॅटेराझ्झी (२००६), स्पेनचा जोआन केफडेविला आणि लुइस गार्सिया, फ्रान्सचे डेविड ट्रेझेगुएट आणि रॉबर्ट पीरिस आदि माजी विश्व चषक विजेते या प्रतियोगितेत खेळणार आहे.
सॉल्ट लेक स्टेडियम शुभारंभी सामना होणार असून दिल्ली, गुवाहाटी, मुंबई, पुणे, गोवा, कोची आणि चेन्नई या अन्य शहरातही लीग सामने होतील.
दिल्ली डायनामोज (दिल्ली), नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी (गुवाहाटी), एफसी पुणे सिटी (पुणे), एफसी गोवा (गोवा), केरला ब्लास्टर्स (कोची)आणि चेन्नईन एफसी (चेन्नई) आदि अन्य संघ फ्रँचाइजी संघ २० डिसेंबरपर्यंत चालणार्या या स्पर्धेत भाग घेतील.
प्रत्येक संघात १४ भारतीय खेळाडू असून किमान २२ खेळाडूंचा संघ आहे. प्रत्येक संघात एका मार्की प्लेयर (विदेशी) आणि सात आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. आठ फ्रँचाइजी संघात आठ मार्की प्लेयर्ससह एकूण ९४ विदेशी खेळाडूचा समावेश आहे.
होम अँड अवे पध्दतीने लीग स्पर्धा खेळविण्यात येणार असून चार अव्वल संघ उपांत्य फेरी गाठतील. डबल लेग उपांत्य लढतीअखेर दि. २० रोजी जेतेपदासाठी अंतिम मुकाबला होईल. विजेत्याना रु. ८ कोटी, उपउपविजेत्यांना रु. ४ कोटी आणि उपांत्य फेरीतील अन्य दोन संघाना रु. १.५ कोटी असे पुरस्कार देण्यात येतील.
शुभारंभी सामना सायंकाळी ७ वा. सुरू होणार असून तत्पूर्वी, ६ वा. सिनेतारका प्रियंका चोप्राचा नृत्याविष्कार तसेच सांस्कृतिक सोहळा होईल. स्टार स्पोर्टस वाहिनीवरून सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
इंडियन सुपर लीग; भारतीय फुटबॉलमधील नवे पर्व
– सुधाकर नाईक
भारतीय ङ्गुटबॉलला नवसंजीवनी देणार्या बहुचर्चित इंडियन सुपर लीगचा शुभारंभ आज कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर होईल. ऍटलेटिको दे कोलकाता, मुंबई एफसी, एफसी गोवा, चेन्नईन एफसी, दिल्ली डायनामोज, नॉर्थ ईस्ट युनायटेड, मुंबई सिटी एफसी, एफसी पुणे सिटी, केरला ब्लास्टर्स आदि आठ फ्रँचाइज संघाचा सहभाग असलेली तथा दि. २० डिसेंबरपर्यंत चालणारी ही बहुप्रतिक्षित प्रतियोगिता इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) धर्तीवर देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये खेळवण्यात येणार आहे. देशातील प्रमुख फुटबॉलप्रेमी उद्योजकांसह सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, महेंद्र सिंह धोनी, वीराट कोहली, रणबीर कपूर, अभिषेक बच्चन, सलमान खान, जॉन अब्राहम आणि ऋतिक रोशन यांसारखे क्रिकेटपटू आणि बॉलीवूड कलाकार सहमालक म्हणून या प्रतियोगितेत उतरल्यामुळे या स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त झाले आहे. इंग्लिश प्रीमिअर लीग आणि स्पॅनिश लीगच्या धर्तीवरील आय् लीग ही भारतातील अव्वल दर्जाची स्पर्धा आहे पण ‘ग्लॅमर’नसलेल्या या स्पर्धेची लोकप्रियता घसरत चालली आहे. मात्र विख्यात विदेशी खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या सहभागासह नव्याने उदयास आलेली इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धा देशातील ङ्गुटबॉलच्या इतिहासात नवा अध्याय लिहिण्यास सज्ज झालेली आहे. फ्रान्सचा माजी आंतरराष्ट्रीय रॉबर्ट पीरिस (एफसी गोवा), इटालीचा माजी आंतरराष्ट्रीय मार्को मॅटेराझ्झी (चेन्नईन एफसी), स्पेनचा लुइस गार्सिया (ऍटलेटिको दे कोलकाता), स्वीडनचा माजी मध्यरक्षक फ्रेडी ल्जनबर्ग (मुंबई सीटी एफसी), ब्राझिल एलानो (चेन्नईन एफसी), फ्रान्सचा डेविड ट्रेझेगुएट (एफसी पुणे सिटी), प्रीमियर लीगमध्ये खेळलेला पहिला मूळ भारतीय फुटबॉलपटू मायकल चोप्रा (केरला ब्लास्टर्स), स्पेनचा जुआन कॅपडेविला (नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी) , इंग्लंडचा माजी आंतरराष्ट्रीय डेविड जेम्स (केरला ब्लास्टर्स), फ्रान्सचा आलेस्झांड्रो डेल पिएर्रो (ऍटलेटिको दे कोलकाता), फ्रान्सचा माजी आंतरराष्ट्रीय निकोलस अनेलका (मुंबई एफसी) आदि दिग्गजांसह तब्बल ९४ विदेशी खेळाडू दहा आठवडे चालणार्या या प्रतियोगितेत आठ फ्रँचाइजी संघाचे प्रतिनिधीत्व करतील. या विदेशी खेळाडूंच्यासाथीने खेळण्याची संधी नैपुण्यकुशल देशी खेळाडूना मिळणार आहे. विदेशी प्रशिक्षक, विशेषत: ‘व्हाइट पेले’ या नावाने परिचित असलेले ६१ वर्षीय झिको यांच्यासारख्या नामवंत प्रशिक्षकांचे अमूल्य मार्गदर्शन देशी युवा खेळाडूंसाठी बहुमूल्य ठरेल. सेलिब्रेटी, उद्योजक आणि नामवंत खेळाडूंचा पाठिंबा असलेल्या इंडियन सुपर लीगचा आस्वाद घेण्यासाठी चाहते पुन्हा स्टेडियमकडे वळतील, असे जाणकाराचे मत आहे. अशा कल्पक आणि प्रयोगशील स्वरूपाच्या स्पर्धेची भारतीय ङ्गुटबॉलला नितांत गरज होती. या स्पर्धेमुळे ङ्गुटबॉलसाठी लागणार्या पायाभूत सोयीसुविधा सुधारणार आहेत. त्याचबरोबर युवा खेळाडूंनाही योग्य व्यासपीठ मिळणार आहे. आयएसएल ही भारतीय ङ्गुटबॉलला नवसंजीवनी देणारी स्पर्धा ठरेल आणि ‘स्लिपीग जायंट’ अशी संभावना झालेल्या भारतीय फुटबॉलचा दर्जा उंचावेल अशी अपेक्षा बाळगूया.
इंडियन सुपर लीग वेळापत्रक
दि. १२ : ऑक्टोबर : ऍटलेटिको दे कोलकाता वि. मुंबई एफसी (सायं. ७ वा., सॉल्ट लेक स्टेडियम, कोलकाता).
दि. १३ : नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी वि. केरला ब्लास्टर्स एफसी (सायं. ७ वा., इंदिरा गांधी स्टेडियम, गुवाहाटी).
दि. १४ : दिल्ली डायनामोज एफसी वि. एफसी पुणे (सायं. ७ वा., नेहरू स्टेडियम, दिल्ली).
दि. १५ : एफसी गोवा वि. चेन्नईन एफसी (सायं. ७ वा., नेहरू स्टेडियम, फातोर्डा, मडगाव).
दि. १६ : नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी वि. ऍटलेटिको दे कोलकाता (सायं. ७ वा., इंदिरा गांधी स्टेडियम, गुवाहाटी).
दि. १८ : मुंबई सीटी एफसी वि. एफसी पुणे सिटी (सायं. ७ वा. डीवाय पाटील स्टेडियम, मुंबई).
दि. १९ : ऍटलेटिको दे कोलकाता वि. दिल्ली डायनामोज (सायं. ४.३०वा., सॉल्ट लेक स्टेडियम, कोलकाता).
दि. १९ : नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी वि. एफसी गोवा (सायं. ७ वा., इंदिरा गांधी स्टेडियम, गुवाहाटी).
दि. २१ : चेन्नईन एफसी वि. केरला ब्लास्टर्स एफसी (सायं. ७ वा., जवाहरलाल नेहरू स्टेडियम, चेन्नई).
दि. २३ : एफसी गोवा वि. ऍटलेटिको दे कोलकाता (सायं. ७ वा., नेहरू स्टेडियम, फातोर्डा, मडगाव).
दि. २४ : मुंबई सीटी एफसी वि. नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी (सायं. ७ वा. डीवाय पाटील स्टेडियम, मुंबई).
दि. २५ : दिल्ली डायनामोज वि. चेन्नईन एफसी (सायं. ७ वा., जवाहरलाल नेहरू स्टेडियम, दिल्ली).
दि. २६ : ऍटलेटिको दे कोलकाता वि. केरला ब्लास्टर्स एफसी (सायं. ४.३०वा., सॉल्ट लेक स्टेडियम, कोलकाता).
दि. २६ : एफसी पुणे सिटी वि. एफसी गोवा (सायं. ७ वा., बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे).
दि. २८ : चेन्नईन एफसी वि. मुंबई सिटी एफसी (सायं. ७ वा., जवाहरलाल नेहरू स्टेडियम, चेन्नई).
दि. २९ : दिल्ली डायनाामेज वि. नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी (सायं. ७ वा., जवाहरलाल नेहरू स्टेडियम, दिल्ली).
दि. ३० : एफसी पुणे सिटी वि. केरला ब्लास्टर्स एफसी (सायं. ७ वा., बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे).
दि. १ : नोव्हेंबर : एफसी गोवा वि. दिल्ली डायनामोज एफसी (सायं. ७ वा., नेहरू स्टेडियम, फातोर्डा, मडगाव).
दि. २ : मुंबई सीटी एफसी वि. केरला ब्लास्टर्स एफसी (सायं. ७ वा. डीवाय पाटील स्टेडियम, मुंबई).
दि. ३ : एफसी पुणे सिटी वि. नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी (सायं. ७ वा., बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे).
दि. ४ : चेन्नईन एफसी वि. ऍथलेटिको दे कोलकाता (सायं. ७ वा., जवाहरलाल नेहरू स्टेडियम, चेन्नई).
दि. ५ : मुंबई सीटी एफसी वि. दिल्ली डायनामोज एफसी (सायं. ७ वा. डीवाय पाटील स्टेडियम, मुंबई).
दि. ६ : केरला ब्लास्टर्स एफसी वि. एफसी गोवा (सायं. ७ वा., नेहरू स्टेडियम, कोची).
दि. ७ : ऍटलेटिको दे कोलकाता वि. पुणे एफसी सिटी (सायं. ७ वा., सॉल्ट लेक स्टेडियम, कोलकाता).
दि. ८ : चेन्नईन एफसी वि. नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी (सायं. ७ वा., जवाहरलाल नेहरू स्टेडियम, चेन्नई).
दि. ९ : एफसी गोवा वि. मुंबई सिटी एफसी (सायं. ७ वा., नेहरू स्टेडियम, फातोर्डा, मडगाव).
दि. ९ : केरला ब्लास्टर्स एफसी वि. दिल्ली डायनामोज एफसी (सायं. ७ वा., नेहरू स्टेडियम, कोची).
दि. ११ : एफसी पुणे सिटी वि. चेन्नईन एफसी (सायं. ७ वा., बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे).
दि. १२ : केरला ब्लास्टर्स एफसी वि. मुंबई सिटी एफसी (सायं. ७ वा., नेहरू स्टेडियम, कोची).
दि. १३ : दिल्ली डायनामोज वि. एफसी गोवा (सायं. ७ वा., जवाहरलाल नेहरू स्टेडियम, दिल्ली).
दि. १४ : ऍटलेटिको दे कोलकाता वि. चेन्नईन एफसी (सायं. ७ वा., सॉल्ट लेक स्टेडियम, कोलकाता).
दि. १५ : नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी वि. एफसी पुणे सिटी (सायं. ७ वा., इंदिरा गांधी स्टेडियम, गुवाहाटी).
दि. १६ : दिल्ली डायनामोज वि. केरला ब्लास्टर्स एफसी (सायं. ७ वा., जवाहरलाल नेहरू स्टेडियम, दिल्ली).
दि. १७ : मुंबई सीटी एफसी वि. एफसी गोवा (सायं. ७ वा. डीवाय पाटील स्टेडियम, मुंबई).
दि. १८ : ऍटलेटिको दे कोलकाता वि. नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी (सायं. ७ वा., सॉल्ट लेक स्टेडियम, कोलकाता).
दि. १९ : चेन्नईन एफसी वि. एफसी पुणे सिटी (सायं. ७ वा., जवाहरलाल नेहरू स्टेडियम, चेन्नई).
दि. २१ : केरला ब्लास्टर्स एफसी वि.ऍटलेटिको दे कोलकाता (सायं. ७ वा., नेहरू स्टेडियम, कोची).
दि. २२ : एफसी गोवा वि. एफसी पुणे सिटी (सायं. ७ वा., नेहरू स्टेडियम, फातोर्डा, मडगाव).
दि. २३ : मुंबई सीटी एफसी वि. चेन्नईन एफसी (सायं. ७ वा. डीवाय पाटील स्टेडियम, मुंबई).
दि. २४ : नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी वि. दिल्ली डायनामोज एफसी (सायं. ७ वा., इंदिरा गांधी स्टेडियम, गुवाहाटी).
दि. २६ : एफसी गोवा वि. केरला ब्लास्टर्स एफसी (सायं. ७ वा., नेहरू स्टेडियम, फातोर्डा, मडगाव).
दि. २७ : नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी वि. चेन्नईन एफसी (सायं. ७ वा., इंदिरा गांधी स्टेडियम, गुवाहाटी).
दि. २८ : दिल्ली डायनामोज वि. मुंबई सिटी एफसी (सायं. ७ वा., जवाहरलाल नेहरू स्टेडियम, दिल्ली).
दि. २९ : एफसी पुणे सिटी वि. ऍटलेटिको दे कोलकाता (सायं. ७ वा., बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे).
दि. ३० : केरला ब्लास्टर्स एफसी वि. चेन्नईन एफसी (सायं. ७ वा., नेहरू स्टेडियम, कोची).
दि. १ : डिसेंबर : एफसी गोवा वि. नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी (सायं. ७ वा., नेहरू स्टेडियम, फातोर्डा, मडगाव).
दि. २ : दिल्ली डायनामोज वि. ऍटलेटिको दे कोलकाता (सायं. ७ वा., जवाहरलाल नेहरू स्टेडियम, दिल्ली).
दि. ३ : एफसी पुणे सिटी वि. मुंबई सिटी एफसी (सायं. ७ वा., बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे).
दि. ४ : केरला ब्लास्टर्स एफसी वि. नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी (सायं. ७ वा., नेहरू स्टेडियम, कोची).
दि. ५ : चेन्नईन एफसी वि. एफसी गोवा (सायं. ७ वा., जवाहरलाल नेहरू स्टेडियम, चेन्नई).
दि. ६ : एफसी पुणे सिटी वि. दिल्ली डायनामोज एफसी (सायं. ७ वा., बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे).
दि. ७ : मुंबई सीटी एफसी वि. ऍटलेटिको दे कोलकाता (सायं. ७ वा. डीवाय पाटील स्टेडियम, मुंबई).
दि. ९ : चेन्नईन एफसी वि. दिल्ली डायनामोज एफसी (सायं. ४.३० वा., जवाहरलाल नेहरू स्टेडियम, चेन्नई).
दि. ९ : केरला ब्लास्टर्स एफसी वि. पुणे एफसी सिटी (सायं. ७ वा., नेहरू स्टेडियम, कोची).
दि. १० : ऍटलेटिको दे कोलकाता वि. एफसी गोवा (सायं. ४.३० वा., सॉल्ट लेक स्टेडियम, कोलकाता).
दि. १० : नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी वि. मुंबई एफसी सिटी (सायं. ७ वा., इंदिरा गांधी स्टेडियम, गुवाहाटी).
दि. १३ : उपांत्य सामना फर्स्ट लेग (लीगमधील चौथ्या आणि पहिल्या क्रमावरील संघात, सायं. ७ वा).
दि. १४ : उपांत्य सामना फर्स्ट लेग (लीगमधील तिसर्या आणि दुसर्या क्रमावरील संघात, सायं. ७ वा.).
दि. १६ : उपांत्य सामना, सेकंड लेग : (लीगमधील पहिल्या आणि चौथ्या क्रमावरील संघात सायं. ७ वा).
दि. १७ : उपांत्य सामना, सेकंड लेग : (लीगमधील दुसर्या आणि तिसर्या क्रमावरील संघात, सायं. ७ वा.).
दि. २० : अंतिम मुकाबला.