भारताच्या चोख प्रत्त्युत्तरानंतर पाकचे हल्ले थंडावले

0
78

भारताने आक्रमक पवित्रा स्वीकारल्यानंतर काल पाकिस्तानी सैनिकांकडून नियंत्रण रेषेनजीक भारतीय हद्दीत होणार्‍या हल्ल्यांमध्ये घट झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानचे दु:साहस त्यांना महागात पडेल असा इशारा भारताचे संरक्षणमंत्री अरूण जेटली यांनी गुरुवारी दिला होता. तसेच पाककडून हल्ले थांबेपर्यंत जशास तसे उत्तर देण्याचे आदेशही भारताने आपल्या सैन्याला दिले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळपर्यंत कथुआतील चार आणि हिरानगर एका चौकीला लक्ष्य करून पाक सैनिकांना गोळीबार केल्याचे वृत्त आहे. तरीही पाकने पुन्हा मोठ्या प्रमाणात हल्ले करण्याचा प्रयत्न केल्यास चोख उत्तर देण्याची सर्व सज्जता आहे अशी माहिती भारतीय लष्कर व सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने दिली.