३४० शॅक्सना अनुमती

0
89

पुढील आठवड्यापर्यंत परवाने मिळणार

गोवा पर्यटन खात्याने यंदाच्या पर्यटन मोसमासाठी उत्तर गोव्यात २४१ तर दक्षिण गोव्यात ९९ किनारी शॅक्सना अनुमती दिलेली असून या शॅक्ससाठीचे परवाने संबंधितांना पुढील आठवड्यापर्यंत मिळणार असल्याचे पर्यटन खात्याचे उपसंचालक अरविंद खुटकर यांनी काल सांगितले. शॅक्ससाठीचे आरेखन करण्याचे काम खात्याने यापूर्वीच हाती घेतलेले असून ते आज शुक्रवारी अथवा उद्या शनिवारपर्यंत पूर्ण होणार असल्याचे त्यानी काल सांगितले.यासंबंधी अधिक माहिती देताना ते म्हणाले की शिस्तबध्दपणे शॅक्ससाठीचे आरेखन करण्याचे काम हाती घेण्यात आलेले असून खात्याचे अधिकारी ते काम करीत आहेत. सर्वाधिक म्हणजेच १०६ शॅक्स कलंगुट येथे उभारण्यात येणार आहेत. तर त्यापाठोपाठ ७८ शॅक्स कांदोळी किनार्‍यावर उभारण्यात येतील. केरी येथे ५, हरमल येथे १०, मांद्रे येथे ८, मोरजी येथे ११, वजरांत येथे ८, हणजुण येथे ६, वागातूर येथे ५, शिरदांव येथे १ व शापोरा येथे २ शॅक्स उभारण्यात येतील. गेल्या वर्षी उत्तर गोव्यात २४१ शॅक्सना परवानगी देण्यात आली होती.
उत्तर गोव्यात ९९ शॅक्सना अनुमती देण्यात आलेली असून माजोर्डा येथे १०, कोलवा ८, लोंगीनोस कोलवा येथे ३, कोलमार कोलवा येथे १, बाणावली येथे १२, कालवाडो येथे २, वार्का येथे ४, फात्राडे-वाडी येथे ७, मोबोर येथे ६, खांडीवाडो – केळशी येथे ११, वेलुदो बाणावली येथे ४, सेर्नाभाटी- कोलवा येथे ३, गोन्सुआ बेताळभाटी येथे २, सनसेट- बेताळभाटी येथे – १, बेताळभाटी रातवाडो- २, बेताळभाटी थंडवाडो येथे ६, वेळसांव येथे २, आरोसी येथे ४, उतोर्डा येथे ७, झालोर येथे ३ व पाळोळे येथे ३ असे शॅक्स उभारण्यास अनुमती देण्यात आलेली आहे.
या शॅक्समालकांना पुढील आठवड्यापर्यंत शॅक्ससाठीचे कायदेशीर परवाने देण्यात येणार असल्याचे खुटकर यांनी स्पष्ट केले. एका वर्षीच्या मोसमासाठी ‘अ’ दर्जाच्या शॅक्सवाल्याना ५० हजार रु. रोख तर ‘ब’ दर्जाच्या शॅक्सना ३५ हजार रु. रोख असे पर्यटन खात्याकडे शुल्क भरावे लागणार आहे.
सीसीटीव्हीसाठी फेब्रुवारीपर्यंत मुदत
दरम्यान, पर्यटन खात्याने शॅक मालकाना शॅकमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची अट घातलेली असली तरी ते बसवण्यास त्यांना फेब्रुवारी महिन्यापर्यंतची मुदत दिलेली आहे असे खुटकर यांनी स्पष्ट केले.