कोणत्याही रेशन दुकानात खरेदीची सुविधा
राज्यातील रेशनकार्ड धारकांना कोणत्याही रास्त भाव धान्याच्या दुकानात जाऊन धान्य खरेदी करण्यासाठी कार्ड धारकांना ‘व्यक्तित्व’ हे ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना अंतिम टप्प्यात पोचली असून वरील कार्डांसाठी आवश्यक असलेली छाननी प्रत्येक पंचायत क्षेत्रात जाऊन करण्यासंबंधीचा प्रस्ताव सध्या वित्त खात्याकडे मंजुरीसाठी पडून आहेत. वित्त खात्याची मान्यता मिळताच प्रत्यक्ष काम सुरू होईल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.काळ्या बाजारावर नियंत्रण शक्य
‘व्यक्तित्व’ कार्ड तयार झाल्यानंतर रास्त भाव धान्याच्या दुकानदारांना धान्य न नेणार्या कार्डधारकांचा कोटा परस्परपणे कोठेही विकणे शक्य होणार नाही. कोटा संपल्यानंतरच त्याना ऑनलाईन पद्धतीने नवा कोटा मागवावा लागेल.
या पद्धतीमुळे धान्याच्या काळ्या बाजारावर पूर्णपणे नियंत्रण येणे शक्य होईल, असे सूत्रांनी सांगितले. कार्ड धारकांची माहिती गोळा करण्याचे काम जीईएलने पूर्ण केले आहे. वित्त खात्याची मान्यता मिळताच प्रत्येक पंचायतीत संबंधित अधिकार्याचे ‘सहा’ दिवस शिबिर आयोजित केले जाईल. राज्यातील किमान २५ टक्के कार्डधारकांची छाननी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. पंचायत क्षेत्रातील छाननीच्यावेळी उपस्थित राहू न शकणार्यांची सोय करण्यासाठी तालुका पातळीवर केंद्रे उघडली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात सुमारे ४ लाख १४ हजार ८४ रेशनकार्ड आहेत. तर रेशन कार्डावरील लाभधारकांची संख्या सुमारे १२ लाख ८० हजार आहे.