पर्यटन हंगामात समुद्र किनार्यांवर शॅक उभारण्यासाठी ८० टक्के जागा निश्चित करण्याचे काम पूर्ण झाले असून पुढील तीन-चार दिवसांत उर्वरित २० टक्के जागा निश्चित केल्या जातील. निश्चित केलेल्या जागांवर शॅक उभारण्यास हरकत नसल्याचे पर्यटन खात्याचे संचालक अभ्यंकर यांनी शॅक मालक संघटनेच्या शिष्टमंडळाला सांगितले. प्रत्येक शॅक बाहेर कचरापेट्या ठेवून परिसरात स्वच्छता पाळण्यास संचालकांनी त्यांना सांगितले.