सरकारी कर्मचार्‍यास मारहाणप्रकरणी पेडण्याच्या नगरसेवकास अटक

0
85

पेडणेचे नगरसेवक विष्णू उर्फ बाप्पा साळगांवकर यांनी वीज खात्याचे कर्मचारी विजय मावळणकर (नानेरवाडा-पेडणे) या सरकारी कर्मचार्‍याला कामावर असताना मारहाण केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी त्यांच्यावर भा. दं. सं.च्या ३५३ कलमाखाली गुन्हा नोंद करून अटक केली.पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल ६ रोजी सायंकाळी ५.१५ वाजता नगरसेवक विष्णू साळगांवकर यांनी मारहाण केल्याची तक्रार श्री. मावळणकर यांनी दिली. आपणास थप्पड व मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले. लगेच साळगावकर यांना अटक करून हणजुण पोलीस स्टेशनच्या कोठडीत रवानगी केली. पेडणे पोलीस स्टेशनची कोठडी नसल्याने त्याना हणजुण पोलीस स्टेशनमध्ये पाठवले. पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर पुढील तपास करीत आहे.