शिवसेनेचा उल्लेख टाळून मोदींच्या महाराष्ट्रात सभा

0
80

शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीड, औरंगाबाद, मुंबई येथे सभा घेतल्या. यावेळी १५ वर्षांच्या आघाडी सरकारने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केल्याचा आरोप त्यांनी केला. विकासासाठी महाराष्ट्रात पूर्ण बहुमत द्यावे अशी मागणी त्यांनी लोकांकडे केली. मात्र कुठेच त्यांनी शिवसेनेचा उल्लेख भाषणात करण्याचे टाळले. सध्या कॉंग्रेसमध्ये आपल्याविरुद्ध टीका करण्याची स्पर्धा सुरू असल्याचे मोदी म्हणाले. लोक विधानसभा निवडणुकीतही लोकसभा निवडणुकीप्रमाणेच मतदान करतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. नवी मुंबई विमानतळ, सी लिंक, मेट्रो प्रकल्प आपल्या कार्यकाळात पूर्ण करून दाखवेन असे आश्‍वासन मोदींनी मुंबईकरांना दिले.