सोनियांचा मोदींना सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व काही त्यांचे सरकार आल्यानंतरच होत असल्याचे भासवत असल्याचा आरोप काल कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला. काळा पैसा आणण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते त्याचे पुढे काय झाले, असा सवाल सोनियांनी केला.
स्वातंत्र्यापासून देशात काहीच झाले नाही, यापुढेच होणार आहे, असे भासवले जात आहे. महागाई खाली आली का ? लोकांना स्वस्त जेवण मिळू लागले का ? याची उत्तरे मोदींनी शोधण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. हरयाणात प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर त्या बोलत होत्या. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनीही कॉंग्रेसवर टीकास्र सोडताना म्हटले की, ज्यांनी गेली साठ वर्षे देशात सत्ता असताना काहीच केले नाही, ते आपल्याकडे काय केले असा हिशेब मागत आहेत. तुम्हाला ६० वर्षात जमले नाही ते ६० महिन्यांत करून दाखवेन असे मोदी म्हणाले. मोदी यांनीही हरयाणात प्रचारसभा घेतल्या.