गृह आधार तसेच दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थींना राजपत्रित अधिकारी, आमदार किंवा खासदाराने प्रमाणित केलेले हयात प्रमाणपत्र संबंधित खात्यात सादर करण्याची मुदत काल दि. १ रोजीपासून सुरू झाली असून दि. ३१ पर्यंत चालू राहील. या काळात वरील प्रमाणपत्रे सादर न करणार्यांचे आर्थिक सहाय्य रद्द केले जाईल, असे खात्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले. वरील दाखला सादर करण्यासाठी आवश्यक असलेले विहिती नमुन्यातील अर्ज महिला आणि बालक कल्याण संचालय तसेच समाज कल्याण खात्याच्या तालुका कार्यालयात तसेच ुुु.वुलव.सेर.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.