रायबंदर येथे नदीत काल संध्याकाळी एका ४० ते ५० या दरम्यानच्या वयोगटातील एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अग्निशामक दलाच्या जवानांनी वर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. मृताच्या चेहर्यावर जखमा असून त्याचा खून करण्यात आला की त्याचे बुडून निधन झाले याचा तपास जुने गोवे पोलीस करीत आहेत.