चॉपर खरेदी गैरव्यवहार प्रकरण
तीन हजार सहाशे कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड चॉपर खरेदी गैरव्यवहार प्रकरण काल उद्योजक गौतम खैतान याना काल अटक करण्यात आली असून त्यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या ७ दिवसांच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. संचालनालयाने त्यांच्या कोठडीची गरज असल्याचा दावा केल्यानंतर दिल्लीतील न्यायालयाने त्यासाठी मान्यता दिली.
यामुळे या प्रकरणात अटक होणारे खैतान हे पहिले आरोपी ठरले आहेत. या खरेदी व्यवहाराच्या काळात खैतान हे चंडिगढस्थित एरोमॅस्ट्रिक्स या कंपनीच्या संचालक मंडळावर होते. या व्यवहारात ही कंपनी गुंतल्याचा आरोप आहे. काल खैतान यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली व न्यायालयासमोर उभे केले.
खैतान हे वकीलही आहेत. संचालनालयाचे वकील नवीनकुमार मट्टा यांनी खैतान यांना १४ दिवसांची कोठडी देण्याची न्यायालयाला विनंती केली. याप्रकरणी पुरावे उपलब्ध करू शकणारी खैतान यांच्या निवासस्थानातील कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाईल आदी साहित्य ताब्यात घेतल्याचे मट्टा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.