किनारी राज्यांमध्ये मच्छीमारी बंदीचा काळ समान ठेवण्याच्या प्रश्नावर संबंधित राज्यांच्या मंत्र्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय मच्छीमारी मंत्री या नात्याने राधामोहन सिंग यांनी दिले, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली.
दिल्लीत झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीत राज्याचे मच्छीमारी मंत्री गेले नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वरील विषयावरील प्रस्ताव बैठकीसमोर मांडण्यास सांगितले होते. ३०० अश्वशक्तीपेक्षा अधिक अश्वशक्तीचे ट्रॉलर मच्छीमारी करीत असल्याने नुकसान होते.