महाराष्ट्रात शिवसेना – भाजप युतीत जागावाटपावरून निर्माण झालेल्या तणावाला काल पूर्णविराम देत काल अखेर दोन्ही पक्षाचे नेते जागावाटपाच्या चर्चेसाठी बसले. दरम्यान, शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांंनी स्वत:ला या बोलण्यांपासून दूर ठेवत पूत्र आदित्य ठाकरे यांना आपल्यावतीने चर्चेस पाठवले. त्यांनी व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रभारी ओ. पी. माथूर यांची भेट घेतली. मतभेद होतात, पण आम्हाला युती पुढे न्यायची आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही शिवसेनेला आमचा प्रस्ताव दिला असून प्रतिसादाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, शिवसेनेने भाजपला ११९ जागा देऊ केल्या आहेत तर भाजपची १३५ जागांसाठी मागणी आहे.