उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोव्यात बकरी ईदसाठी उसगांव येथील मांस प्रकल्पाने तयारी ठेवल्याचे पशुसंवर्धनमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. अनेक मुस्लीम संघटनानी त्यासाठी मागणी केली होती. त्यामुळे नियम शिथिल करावे लागले, असे त्यांनी सांगितले. राज्यात गुरांची कत्तलीस आपले सरकार उत्तेजन देत नाही, असे सांगून गोरक्षा समितीचा आरोप पशुसंवर्धनमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी फेटाळला.