भाजपचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी यांची निवड लोकसभेच्या प्रतिष्ठेच्या आचारसंहिता समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली. ही नेमणूक सभापती सुमित्रा महाजन यांनी केली आहे. ७५ वर्षांवरील व्यक्तीस मंत्री न बनविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळे ८६ वर्षीय अडवाणींना मंत्रिपद हुकले होते. खासदारांच्या वर्तणुकीविषयीच्या तक्रारी आचारसंहिता समितीकडे केल्या जातात. शिवाय खासदारांच्या वागणुकीबाबत स्वेच्छा दखल घेऊन शिफारस करण्याचा अधिकारही समितीला असतो.