बाळ्ळी ते फातर्पा दरम्यान कट्टा येथे कार अपघातात कृपेश देसाई (३५) हे ठार झाले. ते दुपारी तीन वाजता बाळ्ळी येथून आपल्या जीए ०९-डी-९५९९ क्रमाकांच्या स्वीफ्ट कारने फातर्पेच्या दिशेने निघाले होते. वाटेत त्यांच्या गाडीची धडक एका माडाला बसली व ते ठार झाले. कुंकळ्ळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह हॉस्पिसियु इस्पितळात नेला आहे.