काश्मीरसाठी अमेरिकेकडून अडीच लाख डॉलर्सची मदत

0
76

पूरग्रस्त जम्मू काश्मीरच्या पुनर्वसनासाठी अमेरिकेने काल अडीच लाख डॉलर्स मदतीची घोषणा केली. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास एजन्सीमार्फत ही मदत दिली जाणार असल्याचे भारतातील अमेरिकी दूत कॅथलीन स्टीफन्स यांनी सांगितले. हंगामी निवार्‍याची सोय तसेच अन्य मदत पुरवठ्यासाठी निवडक बिगर सरकारी संस्थांच्या माध्यमातून ही मदत दिली जाणार असल्याचे स्टीफन्स यांनी सांगितले. चिल्ड्रन इंडिया, केअर इंडिया, प्लॅन इंडिया यासारख्या बिगर सरकारी संस्थांच्या माध्यमातून ही मदत दिली जाणार आहे.