सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी भारत व व्हियेतनाममध्ये एकमत झाले. दोन्ही देशांदरम्यानच्या समुद्री वाहतुकीला दहशतवादी तसेच चाच्यांपासून संरक्षण मिळावे यासाठी दोन्ही देश परस्पर सहकार्याने उपक्रम राबवणार आहेत. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी चार दिवसांच्या व्हियेतनाम भेटीवर आहेत. काल दुसर्या दिवशी त्यांनी व्हियेतनामचे राष्ट्राध्यक्ष त्रुओंग तान सांग यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, व्हियेतनामचे पंतप्रधान पुढील महिन्यात भारतात येत असून त्यावेळी अनेक परस्पर सहकार्याच्या विषयांवर करार अपेक्षित आहेत, असे संयुक्त घोषणापत्रात सांगण्यात आले.