राज्यातील दुचाकीस्वारांबरोबरच मागे बसलेल्या प्रवाशालाही हेल्मेट सक्तीचे करण्याच्या निर्णयाचा राज्यातील मोटरसायकल पायलटना त्रास होईल याची कल्पना आहे, असे सांगून सध्या महामार्गावरच हा नियम लागू करणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
पायलटांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची तयारीही मुख्यमंत्र्यांनी दर्शविली. राज्यातील रस्त्यांचे रुंदीकरण करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते काम केले जाईल, असे पर्रीकर म्हणाले.