लीज नूतनीकरणास सुप्रीम कोर्टात आव्हान

0
90

२७ खाणींचे लीज नूतनीकरण करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या निवाड्यास गोवा फाऊंडेशनने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. याप्रकरणी आता सोमवारी सुनावणी होणार आहे.
गोव्यातील २७ खाणींच्या लीजांचे नूतनीकरण करण्यास हायकोर्टाने अनुमती दिली होती. मात्र याविषयी सुप्रीम कोर्टाची भूमिका वेगळी होती. आता या लिजांचे भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या हाती आहे.