सुमारे ३०० दिवसांची यात्रा केल्यानंतर भारताचे मंगळयान दि. २४ रोजी मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोचण्याची अपेक्षा आहे. सूर्यमालेच्या कक्षेचा सुमारे ६६६ दशलक्ष कि.मी प्रवास करून हे यान २४ राजी भारतीय वेळेनुसार सकाळी ७.३० वा. मंगळाच्या कक्षेत प्रवेश करेल असे भारतीय अवकाश संंशोधन संस्थेने सांगितले. २४ रोजी कक्षेत प्रवेश करेल तेव्हा हे यान मंगळ ग्रहापासून ४२३ किलोमिटर्स अंतरावर असेल असे त्यांनी सांगितले. रु.४५० कोटींचे मंगळयान भारताने ५ नोव्हेंबर २०१३ रोजी अंतराळात सोडले होते.