कवळे येथील श्री शांतादुर्गा शिक्षण समितीने आपल्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त १३ व १४ सप्टेंबर रोजी दोन दिवसांच्या एका शैक्षणिक परिषदेचे आयोजन केले आहे. कला अकादमीतील दीनानाथ मंगेशकर सभागृहात ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. दोन दिवसांच्या या शिक्षण परिषदेचे उद्घाटन केंद्रीय पर्यटन व संस्कृती राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे मुख्य भाषण होणार आहे. गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सतीश शेट्ये हेही यावेळी हजर असतील.