गोवा लघुचित्रपट महोत्सव पणजीत १७, १८ रोजी

0
118

१५ देशांचे ८० लघुचित्रपट

पहिला गोवा लघु चित्रपट महोत्सव १७ व १८ सप्टेंबर रोजी मॅकॅनिज पॅलेस पणजी येथे होणार आहे. गोवा मनोरंजन सोसायटीने आयोजित केलेल्या या महोत्सवात १५ देशांतील ८० लघु चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत महोत्सवातील लघु चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.