कला संस्कृती खात्याच्या राज्यस्तरीय स्पर्धांचा निकाल घोषित
कला संस्कृती खात्यातर्फे चतुर्थीनिमित्त घेतल्या जाणार्या राज्यस्तरीय माटोळी सजावट व देखावा स्पर्धेचा निकाल काल घोषित करण्यात आला. माटोळी स्पर्धा ही घरगुती गणेशोत्सवांसाठी तर देखावा स्पर्धा ही सार्वजनिक गणेशोत्सवांसाठी दरवर्षी आयोजित करण्यात येते. यंदा माटोळी स्पर्धेत श्रीकांत सतरकर यांना तर देखावा स्पर्धेत ब्रह्मेश्वर युवक संघ, आखाडा-सांत इश्तेव्ह यांना प्रथम पारितोषिके मिळाली आहेत.
माटोळीची परंपरा जपण्याच्या उद्देशाने व पौराणिक कथाधारित ‘देखाव्या’ना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धा घेतल्या जातात. यंदा २१ गणेशोत्सव मंडळांनी देखावा स्पर्धेत भाग घेतला होता.
स्पर्धांचा सविस्तर निकाल –
माटोळी सजावट स्पर्धा – प्रथम पारितोषिक १० हजार रु. – श्रीकांत सतरकर (रैत, कोपारवाडा कुर्टी), द्वितीय पारितोषिक रु. ७ हजार – रमाकांत गांवकर (गोठणवाडा, बेतोडा-फोंडा), तृतीय पारितोषिक रु. ५ हजार – शैलेश गिरोडकर (वेलकासवाडा-सावईवेरे फोंडा). उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते (रु. ३ हजार प्रत्येकी) – दीपक गावकर (साट्रे-सत्तरी), दत्ता नाईक (गावठण प्रियोळ), अजय सतरकर (लोलये काणकोण), शिरीष पै (श्रीस्थळ काणकोण), महादेव गावकर (तळीवाडा – नेत्रावळी).
माटोळी स्पर्धेचे परीक्षण दयानंद भगत, अशोक नाईक आणि पौर्णिमा केरकर यांनी केले.
देखावा स्पर्धा – प्रथम (२० हजार रु.) पारितोषिक – ब्रह्मेश्वर युवक संघ, आखाडा सांत इश्तेव्ह, द्वितीय (१५ हजार रु.) पारितोषिक – काणकोण पोलीस स्टेशन गणेश उत्सव, तृतीय (१० हजार) पारितोषिक – कुंकळेश्वर बाल कला मंडळ, मडकई. रु. ५ हजारच्या पाच उत्तेजनार्थ बक्षिसांचे विजेते – कला युवक संघ (जुवेचा राजा), जुवेे सांत इश्तेव्ह, क्षत्रिय मराठा समाज, रामभुवन वाडा कुंभारजुवे, जॉगिंग सांस्कृतिक मंडळ, काणका बांध म्हापसा, संगमपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – सांगे, कोटेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डिचोली पोलीस स्टेशन. माटोळी स्पर्धेचे परीक्षण राजेश साळगावकर, सचिन नाईक, वितेश नाईक यांनी केले. विजेत्यांना लवकरच कला संस्कृती खात्यातर्फे आयोजित केल्या जाणार असलेल्या खास कार्यक्रमात पारितोषिके प्रदान करण्यात येतील.