वास्को मारामारी प्रकरणातील हल्लेखोरांना ७ दिवस कोठडी

0
94

मांगूरहिल-वास्को येथे रविवारी रात्री दोन गटातील मारामारी प्रकरणातील अटकेत असलेल्या दोन हल्लेखोरांना काल न्यायालयाने प्रत्येकी ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली. तर हल्लेखोरांनी केलेल्या सुरी हल्ल्यात जखमी झालेल्यांपैकी मौलाली हबीब शेख याची प्रकृती अधिकच खालावली असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणात दुर्गेश मदार व मंजू मदार या दोघांना वास्को पोलिसांनी रविवारी अटक केली होती. तर त्यांनी केलेल्या सुरी हल्ल्यात मौलाली हबीब शेख व अब्दुल रेहमान हे जखमी झाल्याने त्यांना बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले होते.