भारतात दिवसाला सरासरी ९२ स्त्रियांवर बलात्कार होतो अशी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोची आकडेवारी सांगते. भारतात बलात्कार वाढत असून २०१२मधील २४९२३ प्रकरणांवरून २०१३ साली ३३७०७ प्रकरणे झाल्याचेही आकडेवारी सांगते. १५५५६ प्रकरणातील पीडित १८ ते ३० वयोगटातील आहेत. शहरांच्या क्रमवारीत दिल्ली पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर मुंबईचा क्रमांक लागतो.
राज्यांमध्ये मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर तर दुसरे राजस्थान व त्यानंतर महाराष्ट्र आहे.