मोदींना ऐकणे ऐच्छिक

0
102

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षक दिनी होणार असलेल्या विद्यार्थ्यांशी संवादाचे प्रक्षेपण पाहणे विद्यार्थ्यांना सक्तीचे नसल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृति इराणी यांनी स्पष्ट केले. मोदी शिक्षकदिनी म्हणजे ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ४.४५ वा. दरम्यान, येथील माणिक शॉ सभागृहात निवडक १ हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. यावेळी देशातील निवडक भागातील विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते बोलणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या माध्यमातून देशातील १८ लाख सरकारी व खासगी शाळांत केले जाईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना गोळा करण्याचे तसेच प्रक्षेपण सामुग्रीची जमवाजमव करण्याचे परिपत्रक जारी झाल्यानंतर काही राज्यांनी विरोध दर्शविला होता.