छापील किमतीएवढेच दुधाचे पैसे द्या

0
96

गोवा डेअरीचे आवाहन
कुर्टी-फोंडा येथील गोवा डेअरीच्या वतीने वितरीत केलेल्या दूध पिशीवर दर छापलेले आहेत. छापील दराप्रमाणेच ग्राहकांनी पैसे वितरकाला द्यावेत, वितरकांनी जास्त पैसे आकारले तर डेअरी व्यवस्थापकांना कळवावे, असे गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एल. सी. सावंत यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.
गोवा डेअरीच्या दुधाला व दूधजन्य पदार्थांना सर्व स्तरातून मागणी आहे आणि ग्राहकांत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नये, असे ते म्हणाले. ग्राहकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी लिहावे किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा. गोवा डेअरीने आजवर दूध व दुधजन्य पदार्थ याचा दर्जा कायम ठेवूनच ग्राहकांना पुरविले आहे. म्हणूनच गोवा डेअरी ग्राहकांच्या विश्‍वासास पात्र ठरली आहे. गोवा राज्यात अन्य दूध कंपन्याचे दूध येत असले तरी जास्त मागणी गोवा डेअरीच्या दुधाला असते. गोवा मुक्तीनंतर गोव्यातील ही डेअरी पहिली आहे, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले व अफवा व अपप्रचारावर कोणी विश्‍वास ठेवू नये असे आवाहन केले.