‘इबोला’वर औषध दृष्टीपथात

0
105

पश्‍चिम आफ्रिदी देशांमधून पसरलेल्या व नंतर जगभरात दहशत निर्माण केलेल्या इबोला आजाराला रोखण्याचा मार्ग आता दृष्टीपथात आला आहे. इबोला आजाराचा संसर्ग झालेल्या माकडांवर नव्या औषधाच्या डोसचे टेक्सास विद्यापीठातील शास्त्रज्ञानी प्रयोग केले. आपल्या या प्रयोगांना यश आल्याचा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.
टेक्सास विद्यापीठाच्या वैद्यकीय शाखेच्या शास्त्रज्ञांनी हे प्रयोग केले आहेत. ज्या माकडांचा वापर यासाठी केला आहे त्यांना ई इबोलाचा संसर्ग होऊन पाच दिवस झाले होते. इबोला आजार झालेल्या रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण ९० टक्के एवढे आहे. तथापि या प्रयोगात वापरलेली सर्व माकडे नव्या औषधाच्या सेवनानंतर पूर्ण बरी झाली आहेत. २१ दिवसानंतर त्यांच्या अंगात इलोबा रोगाची लक्षणे नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या माकडांच्या पेशींमध्ये झेडमॅपची लक्षणेही दिसून आली आहेत.