राज्यात दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन

0
137

राज्यातील गणेशभक्तांनी काल संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत हिरमुसल्या चेहर्‍यांनी पावसाच्या सोबतीत दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले.
राज्यात काल दुपारपर्यंत पावसाने थोडी उसंत घेतली होती. मात्र संध्याकाळी ४नंतर सर्वत्र हलक्या किंवा मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत राहिल्या. त्यामुळे भाविकांना गणेशोत्सवानिमित्त फिरणे त्रासदायक ठरले. वाजत गाजत, मिरवणुकीसह विसर्जन करण्याजोगे वातावरण नसल्याने अनेकांनी वाहनांमधूनच विसर्जनास पसंती दिले.