प्रदेश कॉंग्रेस कार्यकारिणीचा जॉन फर्नांडिसना पाठिंबा

0
100

प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदावरून उचलबांगडी केल्याच्या वृत्ताने प्रदेश कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेल्या खळबळजनक वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर काल सकाळी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेश अध्यक्षांना पाठिंबा देणारा ठरावही बैठकीत घेतल्याची माहिती मिळाली आहे. वरील बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेश अध्यक्ष फर्नांडिस यांनी अन्य विषयांची माहिती दिली होती. मात्र वरील माहिती देण्याचे त्यांनी टाळले. पक्षातील खात्रीलायकरीत्या मिळालेल्या माहितीनुसार वरील ठराव घेतल्याचे कळते. दरम्यान, प्रदेश कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल याबाबतही तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. फर्नांडिस यांची उचलबांगडी केल्यासंबंधीचा आदेश कोणत्याही क्षणी येऊ शकेल, असा काही कॉंग्रेसजनांना विश्‍वास आहे.