नरेंद्र मोदी सरकारने मिझोरामला बदली केल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकर नारायणन यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामापत्र त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठविले आहे. ते २०१० पासून महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम पाहत होते. आपल्या राजीनाम्यासंदर्भात कारण जाहीर करण्यात शंकरनारायणन यांनी नकार दिला. आपल्याला घटनेचा आदर करायचा आहे असे ते म्हणाले. आपल्याला मिझोरामला जाणे शक्य नाही. आपण राष्ट्रपतींना राजीनामापत्र पाठवले आहे. आजपासून आपण या जबाबदारीपासून मुक्त झालो आहे, असे त्यांनी सांगितले.