शापूर-फोंडा येथे काल दुपारी वाहतूक कार्यालयाजवळ जी.ए. ०५ बी. ५४२६ क्रमांकाच्या कारने जोरात धडक दिल्याने हसन महमद शेख हा १३ वर्षाचा सायकलस्वार जागीच ठार झाला.
हसन शेख हा मुलगा दादावैद्य हायस्कुलमध्ये ७वीच्या वर्गात शिकत होता.
झिंगडीमळ-कुर्टी येथे राहणारे आई-वडील, तीन बंधू व तीन बहिणी असे त्यांचे कुटुंब मूळ कर्नाटकचे आहे. दुपारी त्याला केरोसीन आणण्यासाठी पाठवले होते.
नागेशी येथे सोसायटीत केरोसीन आणण्यासाठी कॅन घेऊन सायकलने जात होता.
कारने धडक दिली असता तो उसळून पडला व कार बाजूला फेकली गेली. ड्रायव्हर दामोदर शेट (६५) शांतीनगर फोंडा याला फोंडा पोलिसांनी पंचनाम्यानंतर ताब्यात घेतले. पुढील चौकशी फोंडा पोलीस करत आहे.