निसर्ग संपदेद्वारे पर्यावरण पुनरुज्जीवित केले पाहिजे : वनमंत्री

0
108

पर्यावरण चित्रपट महोत्सवाचा समारोप
मनुष्य हा पर्यावरणाचाच घटक असल्याने पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन कर्तव्यभावनेने आपण करायला हवे. आज विविध प्रकारे प्रदूषणाने आपण वसुंधरेचा नाश करीत आहोत. तेव्हा पृथ्वीवरील जी निसर्गसंपदा आहे त्याद्वारे पर्यावरण पुनरुज्जीवित केले पाहिजे, असे प्रतिपादन वनमंत्री एलिना साल्ढाणा यांनी येथे केले.
कलाकृती आयोजित दुसर्‍या पर्यावरण चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात श्रीमती साल्ढाणा प्रमुख पाहुण्या या नात्याने बोलत होत्या. यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्ष प्रेरणा माईणकर व डॉ. लक्ष्मी भरणे उपस्थित होत्या.
दिलीप परुळेकर यांनी सांगितले की आपण रोजच्या वापरातल्या वस्तू खराब झाल्या म्हणून फेकून देतो. त्या वस्तूंचा उपयोग होवू शकतो याचा कधी विचार करत नाही. त्या वस्तूंचा फेरवापर केला पाहिजे. वसुंधरा ही दैवी देणगी आहे तिचे जतन, संवर्धन करायला हवे. आजूबाजूचे वातावरण (पर्यावरण) चांगले असेल तर सर्वच गोष्टी चांगल्या निघतात असे त्या म्हणाल्या. या महोत्सवानिमित्त रोटरी, जेसी, लायन्स आदी संस्थाच्या सहयोगाने घेण्यात आलेल्या स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. विविध विजेते पुढीलप्रमाणे- निबंधलेखन स्पर्धा : प्रथम गावस (गणेशमंदिर म्हापसा), द्वितीय : निनाद टेग्से (डॉ. के. बी. हेडगेवार पणजी), तृतीय : जेनी राकनोल, उत्तेजनार्थ बक्षिसे : रोनिता नाईक (पीपल्स हायस्कूल मळा), वेदांत कुंभार (शारदा इंग्लिश हायस्कूल). बी. एड. डी. एड विद्यार्थ्यांसाठी मॉडेल मेकिंग स्पर्धा : प्रथम तेरेसा जोस आणि नित्या रॉड्रिग्स, द्वितीय : रीचा गोम्स आणि झेडेकिया रॉड्रिग्स, तृतीय : स्नेहा बेतकीकर यांना प्राप्त झाली.
विद्यालय आणि महाविद्यालयीन स्तरावर माहितीपट आणि लघुपट स्पर्धा : विद्यालय स्तरावर : प्रथम पारितोषिक : माता स्कूल वास्को, द्वितीय पारितोषिक : गणेशमंदिर म्हापसा, तृतीय पारितोषिक : ज्ञानविकास स्कूल पर्वरी, उत्तेजनार्थ पारितोषिक : पीपल्स हायस्कूल पणजी, लुडर्स कॉन्वेंट स्कूल यांना प्राप्त झाले.
महाविद्यालयीन स्तरावर : प्रथम पारितोषिक : सेंट झेवियर म्हापसा, द्वितीय पारितोषिक : डॉन बॉस्को उ. मा. विद्यालय, तृतीय पारितोषिक : फार्मसी कॉलेज पणजी, उत्तेजनार्थ पारितोषिक : रोझरी कॉलेज ऑफ कॉमर्स नावेली यांना प्राप्त झाले. फोटोग्राफी स्पर्धा : प्रथम पारितोषिक : साईश पै रायकर, द्वितीय पारितोषिक : शारिया ताबिता, तृतीय पारितोषिक : लायनल न्यून्स व उत्तेजनार्थ पारितोषिक रोहन दिवकर. माहितीपट आणि लघुपट स्पर्धेच्या खुल्या विभागात झेंट झेवियर म्हापसा यांना पारितोषिक प्राप्त झाले. त्याचबरोबर पथनाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक झेंट झेवियर म्हापसा आणि द्वितीय पारितोषिक गोवा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांना प्राप्त झाले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वेल्थ आऊट ऑफ वेस्ट या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
मिरामार सर्कलपासून सायकल रॅली
समारोप सोहळ्यापूर्वी मिरामार सर्कलपासून ते कला अकादमीपर्यंत नेचर वॉक आणि सायकल रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर पर्जन्य हा समारोपाचा चित्रपट दाखविण्यात आला. बक्षीस वितरण सोहळ्यानंतर पास्टरिंग जर्नी चित्रपट दाखविण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक डॉ. लक्ष्मी भरणे यांनी केले. सुनीता रॉड्रिग्स यांनी सूत्रसंचालन केले.