बायणात आणखी २०३ घरांना कारवाईची नोटीस

0
139

बायणा समुद्र किनारी वसलेल्या आणखी २०३ घरांना नोटीस बजावून ५ सप्टेंबरपयर्र्ंत घरे खाली करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. अन्यथा घरे खाली करण्यात येणार असल्याचा आदेश दिल्याचे मुरगावचे उपजिल्हाधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणार्‍या वाढीमुळे धोकादायक विभागात असलेल्या समुद्र किनार्‍यावरील ७५ घरांवर पहिल्या टप्प्यात कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरीत घरे टप्प्या टप्प्याने कारवाई करून पाडण्यात येणार असल्याचे दक्षिण गोवा जिल्हाधिकारी वेनांसिया फुर्तादो यांनी सांगितले होते.
दरम्यान, पावसामुळे, वादळी वार्‍यामुळे वारंवार समुद्री पाण्याच्या पातळीत होणार्‍या वाढीमुळे समुद्र किनारी असलेल्या घरांची तसेच माडांची पडझड सुरूच आहे. समुद्राच्या लाटांच्या प्रलयंकारीरुपाने येथील समुद्री किनार्‍याची धूप होत चालली आहे. त्यामुळे येथील घरांची व माडांची पडझड झाली व काही मत्स्यवासायिकांना नुकसान सोसावे लागले. दिवसे दिवस पाण्याची पातळी वाढून घरांना लाटांचा तडाखा बसत आहे. तात्पुरते रेती भरून कडे उभे केले असले तरी कडे लाटांच्या ताडाख्याने वाहून जात असल्याचे निदर्शनास येत आहे व पडझड सुरूच आहे.