कोलवाळ अपघातात स्कूटरचालक ठार

0
82

कोलवाळ-पूलापासून दोनशे मीटरवर असलेल्या चार रस्त्यावर एका ट्रकने स्कूटरला धडक दिल्याने स्कूटरचालक ज्ञानेश्वर परब (५८) ताकवाडा-रेवोडा हे जागीच ठार झाले. स्कूटरच्या मागे बसलेली कविता कमलाकांत गावस (४५) नादोडा ही जखमी झाली आहे. तिला बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल केले आहे.
म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीए ११ बी २१९९ या एक्सेस स्कूटरवरून ज्ञानेश्वर परब व कविता गावस कोलवाळ रस्त्यावरून हमरस्ता पार करून चिखलीच्या रस्त्याकडे जात असताना पेडणेहून म्हापसाकडे जाणार्‍या केए २० बी ८४९५ या भरधाव ट्रकने स्कूटरला जोरदार धडक दिली. यात स्कूटर चालक व त्याच्यामागे बसलेली कविता गावस रस्त्यावर पडली यात ज्ञानेश्वर परब जागीच ठार झाले. कविता गावस जखमी झाली. अपघाताची माहिती म्हापसा पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक सदाशिव हन्सीकुट्टी व हवालदार दयानंद मळीक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व ट्रक चालक गोपाळ शेट्टी (५४) उडप्पी याला अटक करून गुन्हा नोंद केला आहे.