पाझरखण कुंकळ्ळी येथे काल दुपारी तीन वाहनांच्या अपघातात कुठ्ठाळी येथील रामनाथ चोडणकर (६०) ठार झाले. तर विप्रांत जीवस देसाई (६) या मुलासह सहाजण जखमी झाले. विप्रांतची अवस्था गंभीर आहे. पोलीस कॉन्स्टेबल जीवास देसाई (३५) कुळवाडो कुंकळ्ळी येथील हा आपल्या जीए ०८ सी ०७९२ दुचाकीवरून पत्नी विद्या व मुलगा विप्रांत सह मडगावहून कुंकळ्ळी येथे निघाले होते. त्या मागून मयत रामनाथ चोडणकर हा पत्नीसह निघाला होता तर समोरून जीए ०२ ए ४७०७ क्रमाकांची युको व्हॅन संदेश वेळीप हा चालक घेवून कुंकळ्ळी येथून मडगावच्या दिशेने जात होता. पाजरखणी, नुसी हॉस्पिटलपासून काही अंतरावर त्याने रामनाथ चोडणकर यांच्या दुचाकीला धडक दिली व त्यानंतर जीवस देसाई यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात पाचहीजण गंभीर जखमी झालीत. त्यांना हॉस्पिटलात नेत असता चोडणकर यांचे निधन झाले तर संदेश वेळीप हाही जखमी झाला आहे. कुंकळ्ळी पोलीस तपास करीत आहेत.